विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सुपे येथे दि.१७ सप्टेंबर रोजी अविष्कार पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. १४० विद्यार्थ्यांनी ७० पोस्टरद्वारे विविध नवकल्पना व संशोधनविषयक संकल्पना सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि प्रात्यक्षिक मांडणीला परीक्षकांनी उच्च दाद दिली
Comments